Chinchwad : रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फे विशेष मुलांना शिकविणा-या शिक्षकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ चिंचवड व झेप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांना शिकविणा-या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. 
इतर मुलांना शिकविणे सोपे असते पण विशेष मुलांना शिकविणे फार अवघड काम असते. या शिक्षकांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून त्या शिक्षकांचा गौरव रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने करण्यात आला.

यावेळी कल्याणी टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष राजेश पाटील, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलकशेट्टी,  सचिव बाळकृष्ण खंडागळे, झेप संस्थेच्या मुख्य नेत्रा पाटणकर, राजन लाखे, संजय खानोलकर, शुभदा गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी 25 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.