Pimple Nilakh News : पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन; सचिन साठे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – विशालनगर पिंपळेनिलख भागातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे इशारा दिला.

साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी पोलिस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, भरत इंगवले, संजय बालवडकर, अनंत कुंभार, काळुराम नांदगुडे, संजय पटेल आणि अनिल संचेती आदी उपस्थित होते.

निवदेनात पुढे म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये बहुतांशी सर्वच भागात कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषता पिंपळे निलख आणि विशालनगर भागात ही समस्या तीव्र आहे. वेळी, अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे विनाकारण सोसायटी आणि चाळीमधील नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.

नियमितपणे मिळकत कर आणि पाणी पट्टीकर भरणा-या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. मागील एक महिन्यापासून या परिसरातील नागरिकांनी येथील नगरसेवकांकडे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेकदा पाठपुरवठा केला आहे परंतू, नागरिकांना न्याय मिळाला नाही.

विशालनगर, पिंपळेनिलख परिसरातील पाणी पुरवठा नियमितपणे पूर्णदाबाने व्हावा यासाठी आपण स्वत: लक्ष द्यावे व येथील करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा साठे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.