Pimpri : सदाशिव खाडे शुक्रवारी स्वीकारणार प्राधिकरण अध्यक्षपदाचा कार्यभार

एमपीसी न्यूज – भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे हे उद्या (शुक्रवारी) दुपारी साडेबारा वाजता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. निगडी येथील प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात हा समारंभ होणार आहे.

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी केली. त्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आता खाडे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

खाडे यांच्या रुपाने भाजपमधील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राधिकरणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यात खाडे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खाडे यांच्या पदग्रहण समारंभास शहरातील पक्षाचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.