Sampada Mehta : राष्ट्रपतींच्या खासगी सचिवपदी पुण्याच्या संपदा मेहता

एमपीसी न्यूज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी मुळच्या पुणेकर असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संपदा सुरेश मेहता यांची नियुक्ती झाली आहे. मेहता यांच्या नियक्तीने प्रशासकीय सेवेतील मराठी चेहर्याला राष्ट्रपती भवनात काम करण्याची संधी मिळाली आहे.

मेहता या 2008 च्या आयएएस तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत. या पुर्वी त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी, जीएसटी विभागाच्या मुंबईच्या सहसंचालक तसेच जऴगाव, हिंगोली, नाशिकसह विविध जिल्ह्यात काम केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीत केंद्रीय वित्त विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत.

पुण्यातील हुजुरपागा शाळेत मेहता यांचे शालेय तर, स.प.महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.2004 साली त्या सीए झाल्या.त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन 2008 च्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली.नव्या नियुक्तीबाबत त्या म्हणाल्या की, राष्ट्रपतींबरोबर काम करण्याची संधी मिळणे हा प्रशासकीय सेवेतील मोठा मान आहे. या पदावर अधिक चांगल्या पध्दतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.