Sangavi Crime News : अवैध सावकारी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – अवैध सावकारी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दाखल फिर्यादीवरून खातरजमा करता आरोपी अवैध पद्धतीने सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून कोर्टाने त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रविण बबन थोरात (वय 34, रा.अभिनव नगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मोहन श्रीराम किनगे (रा. जुनी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज्ञप्ती शिवाय सावकारी करुन आर्थिक फायद्यासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार फिर्यादी मोहन किनगे यांनी दिली होती. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशीअंती तक्रारदार यांनी आरोपीकडून 2019 मध्ये दरमहा 10 टक्के व्याजदराने 40 हजार रुपये घेतले होते. तक्रारदार यांनी आरोपींना व्याजापोटी सलग दोन वर्ष दरमहा गुगल पे / फोन पे द्वारे व्याजाचे पैसे दिले. तरीही आरोपीने तक्रारदार यांना ‘तू माझे मुळ मुद्दल व व्याजाचे पैसे वेळेवर देत नाही म्ह्णून तुला मी मारुन टाकतो, तुला माहीत नाही मी कोण आहे?’ अशी वारंवार धमकी दिली व तक्रारदार मोहन यांना घरात कोंडून जबरदस्तीने पैसे वसुल केले.

पोलिसांनी आरोपी प्रविण थोरात याच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39,45 या प्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली आहे. कोर्टाने आरोपीला 30 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.