Sangavi : पहिल्या लग्नाची कल्पना न देता दुसरे लग्न करत केला पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेले असतानाही (Sangavi) त्याची कोणतीही कल्पना न देता दुसऱे लग्न केले व पत्नीचा छळ केला. यावरून पती व सासरच्या मंडळी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होता.

महिला फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती आशिष सुभाष पवार, महिला आरोपी व सासरे सुभाष तुकाराम पवार (सर्व रा. नवी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri : वेगाने गाडी चालवतो म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे पहिले लग्न झाले होते. असे (Sangavi) असताना देखील आरोपीने याची कोणतीही कल्पना फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला दिली नव्हती. तसेच, त्याने फसवणूक करत फिर्यादीशी लग्न केले. पुढे फिर्यादीच्या सासू व सासऱ्यांनी तुला घरच्यांनी संस्कार केले नाहीत, असे बोलून घरकामावरून छळ केला. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.