Sangavi News : निवृत्तीनंतर मिळालेले स्मृतीचिन्ह चोरट्याने पळविले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नामांकित कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले 45 हजार रुपये चोरट्याने पळवले. शुक्रवारी (दि. 29) समतानगर, नवी सांगवी येथे ही घरफोडीची घटना घडली.

याप्रकरणी विजया राहुल कदम (वय 35, रा. समतानगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलुप लावून बंद होते. शुक्रवारी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून शोकेसमधून 45 हजार रूपये किंमतीचे स्मृतिचिन्ह चोरी करून नेले. हे स्मृतिचिन्ह फिर्यादी यांचे सासरे यांना एका नामांकीत कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर मिळाले होते,  असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.