Sangvi Crime News : नाशिक फाटा पुलाखाली आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – नाशिक फाटा पुलाखाली सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळला आहे.

मृतदेह आढळलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मयत महिलेचा रंग गोरा, केस काळे, मध्यमवयीन असलेल्या महिलेने काळ्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास सांगवी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.