Pimpri : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात पिंपरीतील बाप्पाला भक्तिभावाने निरोप

68 मोठ्या मंडळांसह शेकडो लहान आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गणपती विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट आणि ढोल ताशांच्या पथकांसह गणपती बाप्पा गावाला गेले. दरम्यान विविध सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. यंदा मिरवणुकांमध्ये गुलाल ऐवजी भंडारा उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

एलप्रो वर्कर्स, ब्ल्यू स्टार मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, दुर्गादेवी तरुण मंडळ, झुलेलाल मित्र मंडळ, माईंड स्पेस हॉटेल पिंपरी, जय भारत तरुण मंडळ, पवन मित्र मंडळ, फाईव्ह स्टार तरुण मंडळ, बाल मित्र मंडळ, सदानंद तरुण मित्र मंडळ, एस पी फायनान्स, कलश मित्र मंडळ, जय भारत तरुण मंडळ, कोहिनुर मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ पिंपरी, श्री गणेश मित्र मंडळ नेहरूनगर, श्री जयसिंग मित्र मंडळ, श्री प्रेमप्रकाश मित्र मंडळ, पुणे हॉकर्स पंचायत भाजी मंडई, गुप्ता मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, गणराज तरुण मंडळ, सनशाईन मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, न्यु जैत्य मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, द्वारका मित्र मंडळ, ईगल मित्र मंडळ, न्यु नवजवान मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, शिवराज प्रतिष्ठान, सुपर्ब युथ सर्कल, बाल मित्र मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, श्री बालाजी गणेश मित्र मंडळ, श्रीमहादेव मित्र मंडळ, शिवनेरी सोसायटी मित्र मंडळ, न्यु भारत मित्र मंडळ, सावित्रीबाई फुले मित्र मंडळ, लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई, गौतम मित्र मंडळ, लाल बहादूर शास्त्री मित्र मंडळ, अमरज्योत तरुण मित्र मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, श्री साई प्रतिष्ठान, फ्रेंड सर्कल, श्री ओम साई राम मित्र मंडळ, ज्ञानेश्वर मंडळ, मातोश्री पुष्प भांडार, मयुरेश्वर पुष्प भांडार, वैशाली मित्र मंडळ, भोळेश्वर सेवा तरुण मंडळ, महादेव मित्र मंडळ, युगांतर सेवा मित्र मंडळ, श्री नवचैतन्य तरुण मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, सुदर्शन मोटर्स तरुण मित्र मंडळ, शिवबा प्रतिष्ठान, साई मित्र मंडळ, श्री साई मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, राष्ट्रतेज मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या. ढोल-ताशा पथक, बँड पथक, डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी नाचून गाऊन बाप्पाला निरोप दिला.

एलप्रो वर्कर्स या मंडळाने सव्वाबारा वाजता विसर्जन मिरवणुकांची सुरुवात केली. तर राष्ट्रतेज मित्र मंडळ या मंडळाने रात्री 12 वाजता विसर्जन मिरवणुकीचा शेवट झाला. यावर्षी विसर्जन मिरवणूक एकूण 12 तास चालली. यावर्षी अनेक मंडळांनी थोडक्यात मिरवणूक आटोपली. त्यामुळे मिरवणुकीत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली नाही.

पिंपरी शहरात शिवराजे प्रतिष्ठान (फळबाजार) आणि लाल बहादूरशास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटना (भाजी मंडई) ही दोन मंडळे महत्वाची मानली जातात. पिंपरी मधील विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे या दोन मंडळांच्या मिरावणुकीकडे लक्ष लागलेले असते. शिवराजे प्रतिष्ठानने साई दरबार हा जिवंत देखावा सादर केला. या मंडळाने साडेआठ वाजता विसर्जन केले. तर भाजी मंडई मंडळाने बाप्पा बैलगाडीतून निघाल्याचा देखावा सादर केला. या मंडळाने पावणेदहा वाजता श्रीगणेशाचे विसर्जन केले.

बाप्पांना निरोप देण्यासाठी पिंपरीकर, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग सज्ज होते. प्रत्येकाने विसर्जनासाठी चोख तयारी केली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

पिंपरी-चिंचवड परिसरात हजारपेक्षा अधिक गणेश मंडळांची नोंदणी करण्यात आली होती. त्याव्यतिरिक्त अन्य लहान मंडळे देखील आहेत. आज सर्व गणेश मंडळांनी विसर्जन केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन घाटांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

अग्निशमन विभागाने देखील विसर्जन घाटांवर चोख तयारी केली होती. गणेशोत्सवादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 26 विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाची पथके तैनात करण्यात आली. पथकांमध्ये लिडिंग फायरमन, फायरमन यांचा समावेश होता. तसेच त्यांच्यासोबत लाईफ जॅकेट, लाईफरिंग, दोर, गळ असे अत्यावश्यक साहित्य दिले होते.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान परिसरात ध्वनी प्रदूषण होऊ नये. मोठ्या आवाजांचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ध्वनी प्रदूषण पथक तैनात करण्यात आले. या पथकाने ज्या मंडळाच्या मिरवणुकीत जास्त आवाज होत होता, त्या मंडळांना तात्काळ सूचना देऊन आवाज कमी करण्यास सांगण्यास सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत. नदीमध्ये गणेश विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम घाटांमध्ये विसर्जन करण्याचे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृत्रिम विसर्जन घाटांमध्ये गणेश विसर्जन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.