BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू!; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

0

एमपीसी न्यूज – राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली. या मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आजारपणाला कंटाळून तिने हा प्रकार केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गौरी राऊत (वय 11, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे ती आपल्या शाळेपासून आणि मित्र-मैत्रिणींपासून दुरावली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

पहाटेच्या वेळी एक वाटसरू गौरी राहत असलेल्या इमारतीच्या खालून रस्त्याने जात होता. तेंव्हा त्याला गौरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. त्यानंतर तो व्यक्ती इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने गौरीच्या घराचा दरवाजा ठोठावला. घरातील व्यक्तींना झोपेतून उठवून त्या वाटसरूने घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार करण्यापूर्वी गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3