Pimpri: महापालिका राबविणार आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहर परिवर्तन कार्यालयामार्फत युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन उद्योजक घडविण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. 28 आणि 29 फेब्रुवारी 2020 रोजी होणा-या उपक्रमाअंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नव उद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन, नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. याच्या माध्यमातून उद्योगस्नेही वातावरणाची मुहूर्तमेढ रोवली जणार आहे.

याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मुख्य कार्यालय असणार आहे. यावेळी महापौर उषा ढोरे उपस्थित होत्या. युवा उद्योजक, नव्याने उद्योग उभारणा-या शहरातील युवकांना प्रोत्साहान देणे. त्यांना उद्योग निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे. त्यांचे कौशल्य वृद्धधीत वाढ करणे. शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राखणे. सन 2030 पर्यंत पर्यावरण पूरक व राहण्यायोग्य शहर निर्माण केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ अंतर्गत शहरातील विविध समस्यांवर नागरिकांच्या नाविन्यपुर्ण कल्पनांचा समावेश करणे. उद्योन्मुख व स्टार्टस्अपना व्यासपीठ मिळवून देणे. त्याच्या माध्यमातून गुंतवणूकदार मिळवून देणे. शहरातील नागरिकांमधून उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरातील 20 नाविन्यपूर्ण स्टार्टपसच्या उद्योजक व्यावसायिक प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यातून नव उद्योजकांना प्रेरणा मिळेल. शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात भर पडेल, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.

शहरातील नवोदित, नाविन्यपूर्ण उद्योजकांना कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील एक हजार स्टार्टअप उद्योजक सहभागी होण्याची शक्यता आहे. शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कंपन्यांना ग्राहक, गुंतवणूकदार, भागीदार मिळविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. नव्या उद्योजकांना चालना दिल्याने शहराचा विकासदर वाढेल. रोजगार देणा-या कंपन्या निर्माण होतील. भविष्यात फिरती अर्थव्यवस्था आणायची असेल. तर, असा उपक्रम घेणे आवश्यक आहे.

या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी नाविन्यपूर्ण कल्पनांवर विचार करावा. शहर परिसरातील अडचणींवर नाविन्यपुर्ण उपाय सुचवावेत यासाठी हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. ‘स्टार्टअप’ना यशस्वी होण्यासाठी, त्यांचा विस्तार व्हावा, यासाठी गुंतवणूक, पीओसी, कॉर्पोरेट आणि सरकार यांच्यामार्फत पोचण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करुन देणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे. व्यावसायिक शिक्षण आणि संबंधित माहिती देण्यासाठी देशातील तसेच परदेशातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे.

  • सुमारे 39 लाखांचा खर्च अपेक्षित; खर्चासाठी स्पॉनरशिप घेणार 
    हा महोत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येणार आहे. महोत्सवाचे अर्ज www.festivaloffuture.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सुमारे 39 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापुढील खर्चासाठी स्पॉनरशिप घेणार आहोत. लोगो बनविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी स्पर्धा घेतली जाईल. घोषवाक्य देखील बनविले जाणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.