Sangvi News : पोलिसांनी जप्त केलेली 60 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली. त्यात वाहने जळून खाक झाली. या आगीमध्ये सुमारे 60 दुचाकी वाहने जळाली आहेत. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी चार वाजताच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याजवळ पीडब्ल्यूडी मैदानात घडली.

सांगवी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने जागेच्या अभावामुळे महापालिकेच्या पीडब्ल्यूडी मैदानात लावली जातात. या वाहनांना सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आग आणि धुराचे लोट हवेत पसरले. नागरिकांनी आग बघायला गर्दी केली.

नागरिकांनी सांगवी पोलीस आणि अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पिंपरी मुख्य विभाग आणि राहटणी उपविभाग यांच्या दोन बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.