Sangvi News : सांगवीतील रस्त्यांवर वळूंची दहशत; वळूंच्या बंदोबस्तासाठी महापालिकेला साकडे

Sangvi News : सांगवीतील रस्त्यांवर वळूंची दहशत; वळूंच्या बंदोबस्तासाठी महापालिकेला साकडे Terror of stray bulls on sangvi roads, demand to municipal corporation to stop nuisance of stray bulls

एमपीसी न्यूज – शहरातील विविध चौकात व गल्ली बोळात वळू मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. पावसाळी वातावरणामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. अशात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या वळूंनी दहशत निर्माण झाली आहे. 

रस्त्याच्या मधोमध वळू, मोकाट गाई, वासरे अशी जनावरे ठाण मांडूण बसलेले आसतात त्यामुळे, अपघाचे प्रमाणात वाढ झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यावर उभे असलेले वळू नागरिकांना नेहमीच टक्कर देताना पहावयास मिळत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सांगवीतील फेमस चौकात असेच चित्र पहायला मिळत आहे. वळूच्या निर्माण झालेल्या दहशतीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिक वळूंना घाबरून पळ काढताना दिसत आहेत.

महानगरपालिकेने अशा मोकाट जनावरे व वळूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने संस्थाध्यक्ष  विकास कुचेकर व शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास शहाणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.