Sangvi : चिमुरडी समोर अश्लील वर्तन करून घरच्यांना मारण्याची धमकी; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – सोसायटी मधील टॉयलेटमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीला बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार देऊ नये, यासाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी अडीचच्या सुमारास औंध येथे घडली.

उमेश उर्फ पप्पू रवींद्र सरकनीया (वय 31, रा. औंध) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपीने वसाहतीमधील टॉयलेटमध्ये फिर्यादी यांच्या पाच वर्षीय मुलीला बोलावले. तिथे त्याने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. याबाबत मुलीने घरी सांगितले. त्यावरून फिर्यादी यांनी त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने कोयत्याचा धड दाखवून ‘जर तुम्ही पोलिसात गेलात तर तुम्हाला संपवून टाकीन’ अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.