Sant Nirankari Mission : प्रकृती संवाद कार्यक्रमात संत निरंकारी मिशनने निभावली महत्वपूर्ण भूमिका

एमपीसी न्यूज –  सदगुरूंच्या आदेशानुसार निरंकारी मिशन मार्फत प्रकृतीचा शोषण ( Sant Nirankari Mission) होण्यापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच संदर्भात बिगर सरकारी संस्थांमार्फत दिल्लीच्या रामलीला ग्राउंड वर ‘प्रकृती संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

 या कार्यक्रमात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी तसेच संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज राकेश मुटरेजाजी सहित यांच्यासह अनेक मान्यवर अतिथि, समाज सेवक, एनजीओचे प्रतिनिधी, मंत्रीगण,  पत्रकार उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये आदरणीय जोगिन्दर सुखीजाजी के यांच्या नेतृत्वाखाली निरंकारी मिशन मार्फत समाज कल्याण व पर्यावरण संरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक परियोजनांची सविस्तर माहिती पी.पी.टी.च्या माध्यमातून दाखविण्यात आली.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून एक प्रदर्शनीदेखील लावण्यात आली . ज्यामध्ये सुंदर व पर्यावरण बनविण्यासाठी मिशनकडून राबविण्यात येत असलेल्या वननेस वन, अमृत प्रोजेक्ट, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान, तलासरी प्रकल्प अशा अनेक महत्वपूर्ण परियोजनांचा समावेश होता.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सुद्धा कित्येकदा आपल्या विचारांतून प्रकृतीला अतिसुंदर बनविण्याचे आवाहन करताना म्हणतात, की ही जी सुंदर प्रकृती आपल्याला मिळालेली आहे तिला याहून अधिक सुंदर रुपात सोडून जायचे आहे.

Talegaon Dabhade : राज्यस्तरीय ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेत रायन स्पोर्ट्स क्लब विजयी

कार्यक्रमामध्ये अनेक वक्त्यांनी प्राकृतिक साधने, संरक्षण आणि पर्यावरणाच्या रक्षणाचे महत्व समजावून ( Sant Nirankari Mission) देणाऱ्या विषयांवर सागोपांग चर्चा केली. संत निरंकारी मिशनच्या वतीने आदरणीय राकेश मुटरेजाजी यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर आपले विचार मांडताना बाबा हरदेवसिंहजी यांच्या संदेशाची पुनरुक्ती करुन सांगितले, की प्रदूषण केवळ बाहेरचेच नव्हे तर आतील सुद्धा हानीकारक आहे कारण जोपर्यंत आमचे अंतर्मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण बाहेरील वातावरणदेखील स्वच्छ ठेवू शकत नाही. त्यांनी उदाहरणासहित सांगितले, की पंचमहाभूते आपल्यातच सामावली आहेत. आपण प्रकृतीचे अंगच आहोत, प्रकृतीपासून बनलेले आहोत. संत निरंकारी मिशन प्रकृतीशी आपले अतूट नाते समजावून सांगत आहे.

 प्रकृती संरक्षणा अंतर्गत जल संरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 रोजी मिशनमार्फत अमृत प्रोजेक्टचे आयोजन केले जाणार असून समाज कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या नि:स्वार्थ सेवाही निरंतर चालू राहणार आहेत.

प्रकृती संवाद सारखे उपक्रम आणि अशा अनेक परियोजनांचा उद्देश आपली धरती स्वच्छ, सुंदर व निर्मल बनविणे हाच आहे. यामध्ये मिशनदेखील सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आवाहनाप्रमाणे बहुमूल्य सहयोग देत आपली एक महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. कार्यक्रम समाप्तीनंतर चहापानाचा  प्रबंध संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत करण्यात ( Sant Nirankari Mission) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.