Chinchwad News : भाजपच्या प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्यपदी, चिंचवडच्या प्रभारीपदी संतोष कलाटे

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी कलाटे यांना नियुक्तीचे पत्र दिले. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक विलास मडिगेरी यावेळी उपस्थित होते.

वाकड भागातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात संतोष कलाटे यांचा पुढाकार असतो. गत काळात केलेले सामाजिक काम, राजकीय क्षेत्रातील कार्य, अनुभव उल्लेखनीय आहे. प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन कलाटे यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

आगामी काळात आपण आपल्या सहका-यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम करावे, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.