Nigdi : सरस्वती विद्यालय येथे हिंदी दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – निगडी (Nigdi) प्राधिकरण, सिंधू नगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हिंदी दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंद दाभाडे उपस्थित होते.

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड क्रिडा सेल अध्यक्ष पदी – दत्तात्रय झिंझुर्डे

या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका सुरेखा वाळुंज हे उपस्थित होते. विविध भाषा बोलणारे अनेक समाज आहेत. मात्र, हिंदी ही आपल्या सर्व भारतीयांना एकत्रित जोडण्याचे कार्य करणारी भाषा आहे ती सर्वांनी आत्मसात करावी” असे वैचारिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून केले.

हिंदी भाषेला हजारो वर्षाचा प्राचीन वारसा आहे. हिंदी भाषेच्या बुद्धीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे ,”* असे मत शीतल शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णली चौधरी, सूत्रसंचालन गणेश भोने, आभार प्रदर्शन मोगल बाबू, यांनी केले. हिंदी विषय शिक्षक गणेश भोने ,बाबू मोगल, शीतल शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे संयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.