Today’s Horoscope 15 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 September 2023 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

15.09.2023.

शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 11.36 पर्यंत, नंतर कन्या.

————————————

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

तुमच्या प्रामाणिक मेहेनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. काही बिकट प्रश्न आज तुम्ही सहजच सोडवाल. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. आज उत्साह पूर्ण दिवस.

वृषभ (शुभ रंग- निळा )

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थवराची खरेदी विक्री फायद्यात राहील. आज तुम्हाला मातोश्रीं कडून लाभ संभवतो.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

कर्क (शुभ रंग- सोनेरी)

दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग टाळलेली बरी.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे तुम्ही सहजच पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे आवश्यक आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्यास शब्द देऊन अडकू नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

नोकरीच्या ठिकाणी काही आनंददायी घटना घडतील. सहकारी मित्र तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. दूरचे प्रवास करत असाल तर बेसावध राहू नका.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.

धनु- (शुभ रंग- आकाशी )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा होईल पण तसे करू नका. स्वतःवर संयम ठेवा.

मकर ( शुभ रंग-आकाशी )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नसून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

कुंभ (शुभ रंग – केशरी )

सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागू शकते.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. पती-पत्नी मधे आज दुपारनंतर चांगलेच सुर जुळतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.