Pune : सारिका, सिया, ऐश्वर्या, श्रेयस, कृष्णाची विजयी सलामी

अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धा; पीवायसी हिंदू जिमखाना-हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – सारिका गोखले, सिया रासकर, ऐश्वर्या बांदल, ज्ञानेश्वरी फाळके, श्रेयस लागू, कृष्णा जसूजा यांनी पीवायसी हिंदू जिमखाना आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन (एचटीबीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली.

पीवायसी क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर शनिवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी क्लबचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, सचिव आनंद परांजपे, सारंग लागू, तन्मय आगाशे, अमीत तारे, अजिंक्य दाते यांच्या उपस्थितीत झाले.

या स्पर्धेत महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत सारिका गोखलेने विजयालक्ष्मी सोनावणेवर १५-४, १५-० असा, तर सिया रासकरने मृदुला कांबळेवर १५-३, १५-५ असा विजय मिळवला. यानंतर ऐश्वर्या बांदलने ऋतुजा भालेवर १५-२, १५-२ अशी, तर ज्ञानेश्वरी फाळकेने ऋचा कुलकर्णीवर १५-११, १५-८ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. ऋता गोरेने स्मिता चौधरीचे आव्हान १५-८, १५-११ असे सहज परतवून लावले.

यानंतर १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत रुचिर मांडेने क्रिश हरसोळवर १५-८, १५-७ असा, तर आद्य पारसनिसने तनिश काकडेवर १५-५, १५-८ असा सहज विजय मिळवला. यानंतर श्रेयस लागूने आदित्य राऊतचे आव्हान ११-१५, १५-११, १५-१२ असे परतवून लावले. तर, कृष्णा जसूजाने हर्ष ताम्हणकरवर १५-११, १५-५ अशी मात केली.

निकाल : पहिली फेरी : ११ वर्षांखालील मुली : पीयूषा फडके वि. वि. अनुश्री जोशी ८-१५, १५-३, १५-७; अनूषा सुजन वि. वि. संस्कृती जोशी १५-६, १४-१५, १५-११; अनुष्का छलके वि. वि. पर्णिका ठाकरे १२-१५, १५-१४, १५-१३; आर्या शिंदे वि. वि. रिद्धीमा जोशी १५-१२, १५-९;

१३ वर्षांखालील मुले : रौनक सोनी वि. वि. तन्मय मोरे १५-६, १५-१२; तनिष्क आदे वि. वि. वरद नानेकर १५-१०, १५-१२; पृथ्वीराज चव्हाण वि. वि. पार्थ काशिकर १४-१५, १५-१३, १५-८; गौतम देवाराजू वि. वि. अवनीश कुलकर्णी १५-५, १५-७; शामंतक पाटील वि. वि. एस. गड्डम १५-१२, १५-८; सार्थक पाटणकर वि. वि. सर्वम कुलकर्णी १५-८, १५-६; अमेया बेल्हेकर वि. वि. अर्णव बाजपई १५-७, १२-१५, १५-९; व्योम गुप्ता वि. वि. पार्थ सोनावणे १३-१५, १५-१४, १५-१३.

१५ वर्षांखालील मुली : निकिता कुंटे वि. वि. संयुक्ता माने १५-२, १५-५; सुविक्षा शेंदुरकर वि. वि. गरिमा बन्सल १५-८, १५-७; पुर्वा छलके वि. वि. हर्नीत सचदेव १५-९, ९-१५, १५-११; युविका दोसापती वि. वि. सागरिका शिंगटे १५-३, १५-७; श्राव्या शिवदे वि. वि. सिया जोशी १५-६, १५-१०; वैष्णवी पिसे वि. वि. तनिशा भारांबे १५-८, १५-८; आर्या मुळीक वि. वि. अनन्या जोशी १५-८, १५-४; रक्षा पंचांग वि. वि. साना मोइरंगथेम १५-१, १५-६; सांभवी तिवारी वि. वि. रिया भालेराव १५-१०, १५-८; अनन्या एन. अगरवाल वि. वि. विभा मानधना १५-२, १५-५; श्रेया मेहता वि. वि. श्राव्या बेंद्रे १५-१४, १५-४; स्वामिनी तिकोणे वि. वि. जान्हवी शुक्ला १५-२, १५-३; रिया कुलकर्णी वि. वि. अल्फिया शेख १५-६, १५-१०; सानिया सकपाळ वि. वि. लावण्या गुप्ता १५-१४, १३-१५, १५-१२; दिव्यांश वाहळ वि. वि. श्रावणी जाधव १५-७, १४-१५, १५-६; गरिमा जांबुकर वि. वि. आभा कुलकर्णी १५-१३, १५-१३; सोनिया पगारे वि. वि. इरावती जोशी १५-५, १५-२;

१७ वर्षांखालील मुले : कुणाल रसाळ वि. वि. चैतन्य काळभैरव १५-६, १५-११; नमन सुधीर वि. वि. आर्यन बुदुख १५-३, १५-२; विवेक हब्बू वि. वि. नील तोडकर १५-३, १५-२; मयांक राऊत वि. वि. इशान रानवरे १५-७, १५-११; रोहन नाईक वि. वि. तनय मंत्री १५-५, १५-४;

१९ वर्षांखालील मुले : अनिकेत सोमन वि. वि. स्वरूप बनकर १५-१०, १५-७; चिराग भगत वि. वि. मानस कडवे १५-३, १५-३; अनिश कामत वि. वि. यज्ञेश पाटील १५-५, १५-८; नीलाबजो पाल वि. वि. शिवम पवार १५-४, १५-६; हर्ष वि. वि. अद्वैत देशपांडे २-१५, १५-११, १५-१३; अथर्व यादव वि. वि. सोहम तिवारी १५-५, १५-९; मोक्षित पोरवाल वि. वि. विवेक हब्बू १५-७, १५-८; वर्धन डोंगरे वि. वि. लौकिक ताथेड १३-१५, १५-१२, १५-९.

१९ वर्षांखालील मुली : साद धर्माधिकारी वि. वि. श्रेया शेलार १५-७, १५-१०; श्रेया शहा पुढे चाल वि. चैत्रा आपटे; स्मिता चौधरी वि. वि. सायली साळुंखे १५-५, १५-३; नेहल प्रभुणे वि. वि. स्मितल मंडलिक १५-१०, १५-३; शरोदिया सरकार वि. वि. रिद्धी मंगलकर १३-१५, १५-१०, १५-१०; अस्मिता शेडगे वि. वि. सई पळशीकर १५-११, १५-६.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.