-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari: विवाहितेचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत वारंवार शिवीगाळ, हाताने मारहाण करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय दगडू रोकडे (वय 23, रा. मोहननगर, भोसरी) याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत तू वेडपट आहेस, तुला काही येत नाही, असे म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn