Savitribai Phule University : सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला माध्यम क्षेत्राशी संबंधित दोन अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून (Savitribai Phule University) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला माध्यम क्षेत्रासाठीचा पदवी आणि सर्टिफिकेट कोर्स असे दोन अभ्यासक्रम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे माध्यम क्षेत्रात ‘करीअर’ घडवू इच्छणाऱ्या मुलींना आता शिक्षणासाठी आणखी एक समर्थ पर्याय उपलब्ध झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु झाले असून, कोणत्याही शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी या अभ्यासासाठी प्रवेश घेऊ शकणार आहे.  

भारतात स्त्री शिक्षणाची प्रवर्तक संस्था मानल्या जाणाऱ्या महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयांतर्गत 2013 पासून ‘स्मार्ट’ म्हणजेच स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ही सुसज्ज माध्यम प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. याठिकाणी माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षकांसह स्टुडिओ आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध असून, मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. याच ‘स्मार्ट’द्वारे आता माध्यम क्षेत्रातील बी. व्होक (व्होकेशनल) मिडीया आणि एन्टरटेनमेंट’ हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तसेच ‘सर्टिफिकेट कोर्स इन मिडीया स्किल्स’ हा एक वर्षांचा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थीनीना माध्यमे आणि ह्युमानिटीज, कॅमेरा, अँकरिंग, साउंड, रेडिओ, पोस्ट-प्रॉडक्शन, माध्यम कायदा आणि नीतिशास्त्र अशा विविध गोष्टी शिकविल्या जातील.

PM Modi Dehu Visit : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद; वाचा सविस्तर…

याबाबत स्मार्ट’च्या संचालिका राधिका इंगळे म्हणाल्या, “या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींना केंद्रस्थानी ठेवून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 4जी तंत्रज्ञानानंतर माध्यम क्षेत्रात अनेक बदल घडले. आता 5 जी नंतरही बरेच बदल होणार असल्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे कौशल्याधारित शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत माध्यामात कंटेट रायटिंग सारख्या कामात मुलींचा अधिक सहभाग दिसून येतो. मात्र व्हिडिओ तंत्रज्ञान, साउंड इंजिनिअरींग, प्रोडक्शन अशा तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांमध्येही मुलींचा सहभाग वाढावा, यावर अभ्यासाक्रमात भर दिला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक ‘आॅडिओ’ स्टुडिओ तयार असून, ‘व्हिडिओ’ स्टुडिओचे देखील काम सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थीनींना अधिक चांगले प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेता येईल. ’’

या अभ्यासक्रमासाठी (Savitribai Phule University) शुल्क अतिशय किफायतशीर असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती www.schoolofmediaart.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.