Infosys : ‘कलरलेस’मधून नृत्य, अभिनय, कलेचे प्रभावी सादरीकरण

एमपीसी न्यूज : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस (Infosys) फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘डिफरंट स्ट्रोक्स’ प्रस्तुत ‘कलरलेस’ कार्यक्रमातून भरतनाट्यम, अभिनय आणि कलेचा एकत्रित आविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.
शनिवार, 11 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. संकल्पना सुचेता जोशी यांची होती. प्रकाश योजना सचिन लेले यांची होती. या सादरीकरणाला आनंद चाबुकस्वार यांनी आवाज (व्हॉईस ओव्हर) दिला. यामध्ये 13 युवती सहभागी झाल्या.
कलरलेस हा या पूर्वग्रहांनी त्रासलेल्या मनाचा व पूर्वग्रहांमधील संवाद होता. मन ज्यावेळा तटस्थपणे आपल्या चुकांकडे बघते, आपण असे का वागतो याचा मागोवा घेते, तेव्हा त्याला काय दिसते? त्याचे प्रतिबिंब कलरलेसमध्ये  दिसले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस (Infosys) फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 124 वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. प्रारंभी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.