Hadapsar : सिजन मॉल मधील फुडकोर्टच्या बिलामध्ये फेरफार, 10 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये कामावर ठेवलेल्या दोघांनी बिलींग मशीन मधील बिलांमध्ये फेरफार करून जवळपास 10 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुलै 2017 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत मगरपट्टा येथील सिजन
मॉल मधील फुडकोर्ट मधील पास्ता पिझ्झा नावाच्या हॉटेलमध्ये हा अपहार केला आहे.

याप्रकरणी ओमकार मुरकुटे (वय 30, रा. लोहगांव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी ओमकार यांनी दोन जणांना विश्वासाने त्यांच्या मगरपट्टा येथील सिजन मॉल मधील फुडकोर्ट मधील पास्ता पिझ्झा नावाच्या हॉटेलमध्ये कामावर ठेवले होते. मात्र त्या दोघांनी कस्टमर्स कडून रोख येणारे बील घेऊन पुन्हा बिलींग मशीन मधील बिलांमध्ये फेरफार करून जवळपास 10 लाखांचा अपहार केला आहे.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.