BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी मज्जाव केल्यावरून ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

चंद्रकांत नारायण काटे (वय 61, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी), असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील नारायण काटे, आदित्य सुनील काटे (दोघे रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी चंद्रकांत यांनी त्यांच्या घराच्या परिसरात आरोपींना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मज्जाव केला. यावरून दोघा आरोपींनी मिळून चंद्रकांत यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या पायाच्या घोट्यावर, पाठीवर, हातावर गंभीर दुखापत झाली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3