Kabaddi Tournament : स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांची विजयी घोडदौड

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस (Kabaddi Tournament) पक्ष, बाणेर- बालेवाडी, सुस व म्हाळुंगे आयोजित व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सकाळच्या सामन्यात पुरूष विभागातील रायगडच्या मिडलाईन संघाने उपनगरच्या उत्कर्ष संघावर अत्यंत चुरशीची लढत देत 42-38 असा निसटता विजय मिळविला. मध्यांतरात मिडलाईन संघाकडे 21-16 अशी आघाडी होती. हीच आघाडी मिडलाईन संघाने कायम ठेवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यात सुयोग गाडेकर व राजेंद्र देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना वैभव मोरे यांनी पकड घेत चांगली साथ दिली. उत्कर्ष संघाच्या राकेश हेगडे व रोहन हेगडे यांनी चांगला प्रतिकार केला.

पुण्याच्या राकेशदादा घुले संघाने उपनगरच्या जॉली संघावर 48-30 अशी मात करत विजय मिळविला. मध्यांतरात राकेशदादा घुले संघाकडे 24-16 अशी आघाडी होती. मध्यांतरातनंतर ही आघाडी वाढत गेली व जॉली संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. राकेशदादा घुले संघाच्या अभिमन्यू गावडे यांनी चौफेर चढाया करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पवन कारंडे याने पकडी घेतल्या. जॉली संघाच्या अभिषेक नहर याने एकाकी लढत दिली.

सायंकाळच्या सत्रात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने चिपळूनच्या दसपटी संघावर 40-23 असा विजय मिळविला. मध्यंतराला बाबुराव चांदेरे फाऊंडेशन संघाकडे 14-11 अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर मात्र, बाबुराव चांदेरे फाऊंडेशनच्या खेळाडूंनी आपले आक्रमण व बचाव करत दोन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळविला. बाबुराव चांदेरे फाऊंडेशन संघाच्या सनी पवार व निलेश काळबेरे याने मैदान दणाणून सोडत दसपटी संघाचा बचाव भेदण्यात यश मिळविले. त्यानंतर सचिन पाटीव व विनित कालेकर यांनी चांगली पकड घेत दसपटचे आक्रमण मोडून काढले. दसपटी संघाच्या अभिषेक भोजने याने खोलवर चढाया करत चांगला प्रतिकार केला. तर, सौरभ मोहिते व रोशन कदम यांनी चांगल्या (Kabaddi Tournament) पकडी घेतल्या.

Bank Privatization Bill : बँकांच्या खाजगीकरणाचे विधेयक मांडल्यास धरणे आंदोलन

Kabaddi Tournament

महिला विभागात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने बारामती स्पोर्टस अॅकॅडमी संघाचा 62-20 असा पराभव करून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. मध्यांतरात राजमाता जिजाऊ संघाकडे 29-11 अशी भरघोस आघाडी होती. राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकर व सायली केरीपाळे यांनी चौफेर चढाया करत सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजविले. अंकिता जगताप हिने चांगल्या पकड घेतल्या. स्पोर्टस अॅकॅडमी बारामतीच्या साक्षी काळे हिने चांगला खेळ केला. निकिती खाडे हिने काही पकड घेतल्या.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस क्लब संघाने पुण्याच्या एमएच स्पोर्टस संघावर 37-32 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यांतरात स्वराज्य स्पोर्टस संघाकडे 23-10 अशी आघाडी होती. स्वराज्य संघाच्या याशिका पुजारी व श्रुतीका गाडीगावकर यांनी खोलवर चढाया करीत एमएच संघावर सुरुवातीपासूनच दबाव टाकत नामोहरम केले होते. त्यांना शर्वरी गोडसे हिने चांगल्या पकडी घेत साथ दिली. एम.एच. स्पोर्टस संघाच्या प्रतिक्षा कऱ्हेकर हिने उत्कृष्ठ चढाया करत व आदिती चौघुले यांनी पकड घेत सामन्यात चांगलीच रंगत आणली होती.

प्रकाशतात्या बालवडकर संघाने जागृती संघावर 61-29 अशी दणदणीत मात करत विजय मिळविला. मध्यांतरातच प्रकाशतात्या बालवकर संघाकडे 31-13 भक्कम आघाडी होती. प्रकाशतात्या बालवडकर संघाच्या आम्रपाली गलांडे, आफ्रिन शेख यांनी आक्रमक खेळ करत आपल्या संघाला मध्यांतरातपूर्वीच विजयी आघाडी मिळवून दिली होती. तर प्रिया चव्हाण व अंकिता चव्हाण यांनी देखील पकड घेत चांगली साथ दिली. जागृती संघाच्या ऋतिका होनमाने, साक्षी म्हसुरकर यांनी चांगली लढत दिली. तर, घनिका टेंकल हिने काही पक़डी घेतल्या.

इतर झालेल्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे-

पुरूष- एनटीपीसी नंदुरबार वि.वि. सरस्वती पुणे (44-20), बाबुराव चांदेरे फाऊंडेशन वि.वि.ओवळी उपनगर (35-16),चेतक पुणे वि.वि. उत्कर्ष उपनगर(36-27)

धर्मवीर बालेवाडी वि.वि. शिवशक्ती धुळे (51-21), सुवर्णयुग वि.वि. जिजाऊ स्पोर्टस कोल्हापूर (30-26), स्वराज्य स्पोर्टस् वि.वि. स्पोर्टस अॅकॅडमी बारामती(31-25)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.