Pune : राज्यात पुढील वर्षी ऊस उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होणार – शरद पवार

एमपीसी न्यूज – देशात दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र साखरेचे उत्पादन घेणारे राज्य ठरले आहे. ही चांगली बाब आहे. पण जादा साखरेचे उत्पादन झाल्याने बाजारात मागणी कमी झाली आहे. यामुळे साखर उत्पादक आणि कारखानदार क्षेत्र अडचणीच्या काळातून जात आहे. यामुळे राज्यात पुढील वर्षी 40 ते 50 टक्क्यांनी उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यात दी महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वतीने साखर परिषद 20-20 चे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाच्या समारोपला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, विद्याधर अनासकर तसेच साखर कारखानदार देखील उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, गोदामात मोठ्या प्रमाणावर साखर पडून आहे. आता त्याचे काय करायचे असा प्रश्न साखर कारखानदारासमोर उभा राहिला आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून साखर उत्पादक आणि कारखानदारांच्या दृष्टीने दिलासा देणारा निर्णय घेतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील काही वर्षापासून साखरे पासून इथेनॉल तयार करण्याबाबत चर्चा ऐकण्यास मिळते. या प्रश्नावर सरकारने इथेनॉलचे प्रमाण किती असावे. हे ठरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.