Shirgaon : पवना नदीच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – शिरगाव येथे पवना  नदीच्या काठावर लावलेल्या (Shirgaon) दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये चार लाख 80 हजारांचा ऐवज पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

प्रज्योत ईश्वर राजपूत (वय 19, रा. शिरगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या (Shirgaon) आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निखील पाटील यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : तरुणावर ब्लेडने वार करत बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. त्यामध्ये आरोपीने सहा हजार लिटर गुळ मिश्रित रसायन खड्ड्यात साठवून ठेवले.

याबाबत माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी तिथून पळून गेला. पोलिसांनी चार लाख 80 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.