Pimpri : शिवसेनेचे स्टार प्रचाराक जाहीर, आढळरावांना डावलले 

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने आज (गुरुवारी) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 20 जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, या यादीमध्ये शिरुरचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराकरिता स्टार उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. पक्षाच्या स्टार प्रचाराकांची नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागतात. शिवसेनेने आज आपल्या 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केले आहे. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, माजी मंत्री अनंत गीते, आनंदराव आडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आदेश बांधेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, लक्ष्मण वडाळे, नितीन बानगुडे, वरुण सरदेसाई, दिगंबर नाईक, शिवरत्न शेट्टइ, राहुल लोंढे हे स्टार प्रचारक आहेत.  शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी ही यादी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अनंत गीते, आनंदराव आडसूळ यांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक झाली आहे. परंतु, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत डावलण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.