Chakan : चाकण शहराचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न मिटणार – शिवाजीराव आढळराव पाटील

चाकणला कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – चाकण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 160 कोटी रुपयांची ( Chakan ) पाणी योजना मंजूर झाली आहे. चाकण शहराची पुढील 50 वर्षापर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आलेल्या ह्या योजनांचे काम प्रत्यक्षात लवकरच चालू होईल अशी माहिती शिरूर लोकसभेचे मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  सदर योजनेसाठी शासन दरबारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांच्यासह पाठपुरावा सुरु होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी भेटून या साठी प्रयत्न केल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

 

Maval : विकसित भारतासाठी जनतेने मोदींच्या पाठीशी उभे रहावे – विक्रांत पाटील

चाकण शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 10 फेब्रुवारी )  करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या विकास कामांचे भुमिपुजन प्रसंगी शिवसेनेचे सर्व माजी नगराध्यक्ष, नगसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार आढळराव पाटील आणि नितीन गोरे यांनी चाकणची मंजूर झालेली 160कोटींची पाणी पुरवठा योजना आणि विकास कामांच्या बाबत माहिती दिली.

यावेळी शहरातील विविध प्रभागात विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये भरत कानपिळे ( Chakan ) घर ते सारा ऑर्चीड सोसायटी पर्यंत ओढ्याला संरक्षक कठडा बांधणे, प्रभाग क्र.21 मधील वडवेनगर रस्ता काँक्रीटीकरण करने, चक्रेश्वर मंदिर येथील मनशक्ती आश्रम ते काळुसरोड पुलापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, चाकण पार्क मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करने व स्ट्रीट लाईट बसविणे, मोहन पार्क येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे, सावतामाळी चौक ते ऐश्वर्या आंगण पर्यंत रस्ता रुंदीकरण , झित्राई माता मंदिर परिसर काँक्रीटीकरण , प्रभाग क्र. 1 मधील नाला ते केदारी घर रस्ता काँक्रीटीकरण , चौधरी ट्रेडर्स ते नितिन अहेर घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण , सावतामाळी मंदिरासमोरील जागेत काँक्रीटीकरण, आंबेठाणरोड भागात काँक्रीटीकरण व गटार लाईन व आंबेठाण रोड ते ऐश्वर्या आंगण दरम्यान स्ट्रीट लाईट पोलसह बसविणे आदी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हासंघटक अशोक भुजबळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख राजूशेठ जवळेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, स्नेहा जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश गोरे, ऋषिकेश झगडे, गटनेते निलेश बबनराव गोरे, शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, नगरसेवक प्रवीण गोरे, नगरसेविका सुजाता मंडलिक, रोनक गोरे, बिपिन रासकर युवासेना शहर प्रमुख अभिजित जाधव, शिवसेना सरचिटणीस धनंजय फडके, रोहकल गावच्या सरपंच प्रमिला काचोळे,  संदीप कचोळे, पांडुरंग गोरे, रत्नेश शेवकरी, सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

चाकणच्या विकास कामांसाठी पाठपुरावा –  नितीन गोरे
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांनी सांगितले की, चाकण शहराच्या प्रत्येक भागात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला असून या पुढील काळातही चाकण शहराच्या विकासासाठी कटबद्ध आहे. तसेच चाकण शहराचा वाहतूकोंडी ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी आंबेठाण चौक ते ऐश्वर्या आंगण सोसायटीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन मंजूर झालेल्या महामार्गाचे काम होई पर्यंत वाकीफाटा ते आळंदीफाट्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता वाढवण्यासाठी पर्याप्त निधी मिळण्यासाठी राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उपनेते व  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु ( Chakan ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.