Shivbhojan Thali : 31 मार्चपर्यंत मिळणार पाच रूपयांत शिवभोजन

Shivbhojan will be available till March 31 for five rupees

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, मजूर, स्थलांतरित यांना निम्म्या किंमतीत जेवण मिळावे यासाठी सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचा दर पाच रूपये केला होता. या निर्णला सरकारने आता 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे मार्च अखेर पर्यंत पाच रूपयांत शिवभोजन करता येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बंधने यामुळे गरिबांना कमी दरात जेवण मिळावे यासाठी मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचा दर 10 रूपये वरून 5 रूपये करण्यात आला होता.

आता या निर्णयाला सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे आणि पिंपरी रोज सरासरी 3000 नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने मुदतवाढ केल्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.