Pune News : मतदार ओळखपत्राऐवजी मतदानासाठी लागतील ‘ही’ 9 कागदपत्रे !

एमपीसी न्यूज : विधानपरिषद निवडणुकीच्या पदवीधर – शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त अन्य 9 पर्यायांचा देखील वापर करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र व्यतीरिक्त इतर 9 कागदपत्रे अशी आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने दिलेल्या महितीनुसार मतदान करण्यासाठी ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.

1) आधार कार्ड

2) वाहन चालक परवाना

3) पॅन कार्ड

4) पारपत्र

5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र

7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र

9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.