Pimpri Crime News : अवैध गुटखा विक्री प्रकरणी शहरात सहा ठिकाणी कारवाई, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – अवैध गुटखा विक्री प्रकरणी शहरातील विविध सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 04 ते 05 या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

आदित्य शगुन मॉलच्या पार्किंगमध्ये हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत 2 लाख 28 हजार 550 रूपयांचा अवैध गुटखा आणि चारचाकी गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी गोविंद जेपाराम प्रजापती (वय 47, रा. बावधन, मुळशी) याला अटक केली आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने सदुंबरे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे कारवाई करत 3 लाख 86 हजार 090 रूपये किंमतीचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. समिर दत्तात्रय गाडे (वय 38, रा. सदुंबरे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून, एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

राजवाडा चौक, तळेगाव दाभाडे येथील साईनाथ पान टपरीवरती गुटखा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. रामप्रकाश श्रीमैय्यादी वर्मा (वय 35, रा. साईनगर, मावळ) याला अटक करण्यात आली आहे.

राजवाडा चौक, तळेगाव दाभाडे आणखी एक कारवाई करत नागनाथ शिवाजी जाधव (वय 42, साईनगर मावळ) याला अटक केली आहे. पोलिसांनी 2,914 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकण तळेगाव रोड, म्हाळुंगे ता. खेड येथे सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत 1 लाख 95 हजार 388 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सुशिल उर्फे अमित राधेश्याम गुप्ता (वय 32, रा. चाकण तळेगाव रोड, म्हाळुंगे ) याला अटक केली आहे. आणखी दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

उर्से गावात स्वामी समर्थ किराणा दुकानात व दत्त कृपा किराणा दुकानात विक्रीसाठी गुटखा ठेवला होता. पोलिसांनी 53 हजार 830 रूपयांचा गुटखा जप्त केला असून, अरूण शांताराम कारके (वय 50, रा. उर्से) आणि कालिदास सुरेश दातखिळे (वय 34, रा. उर्से) असे अटक आरोपींची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.