Bhosari : विवाहितेच्या छळप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला असल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. त्यानुसार सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

अनिल बबन सातव (वय 42), गंगूबाई बबन सातव, बबन सखाराम सातव, सुरेश बबन सातव, मंगल अशोक पवळे (सर्व रा. हनुमान कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), जयश्री गणेश पारवे (रा. कॉटन ग्रीन, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2013 ते 1 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना भोसरी येथे घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांनी घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाणही केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.