Pimpri : पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून काढला गाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे पाइपलाईनमध्ये गाळ साचला होता. पाइपलाईनमधील संपूर्ण गाळ काढल्याचे स्वच्छ पाणीपुरवठा सुरु झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी सांगितले.

विद्यानगर, पर्वती चौक,  हनुमान मंदिर, परशुराम चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमध्ये पावसामुळे गाळ साचला होता. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होत होता. पाण्यामध्ये बारीक आळ्या व गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात येत होते. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणात जुलाब, उलटी, खोकला, पोटदुखी अशा आजारांना सामोरे जावे लागत होते.

याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. अधिका-यांनी तातडीने पाइपलाईनमधील गाळ काढला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.