Pune News : तर PMPML सेवा बंद करू; वाचा कोणी दिला इशारा? 

एमपीसी न्यूज : कोरोनाचे संकट टळल्यानंतर पीएमपीएल रुळावर येत असतानाच आता बस सेवा खंडित करण्याचा इशारा पीएमपीएमएल प्रशासनाला पत्राद्वारे दिला आहे. बसेस पुरवणाऱ्या ठेकेदारांकडून बिलांची थकबाकी न मिळाल्यास बस सेवा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्ष बस बंद असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बँकेचे हप्ते थकल्याने नाईलाजास्तव बसेस बंद होतील असे पत्र ठेकेदारांकडून पीएमपीएमएलला देण्यात आले आहे.

पीएमपीएमएलची सेवा मागील दोन वर्षापासून बंद होती. काही बसेस धावत असल्या तरी खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ जमत नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ तोट्यातच आहे. यातच आता ठेकेदारांनी बस पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिल्याने येत्या काळात पीएमपीएमएलच्या ताफ्यातील अर्ध्याच म्हणजे सातशे बसेसना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसू शकतो.

पीएमपीएमएल प्रशासनाच्या ताब्यात स्वतःच्या मालकीच्या सुमारे 800 बसेस आहेत. त्यातील सातशे ते साडे सातशे बसेस या सध्या रस्त्यावर धावतात. तर एकूण बसेस या 1500 इतक्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका सोबतच ग्रामीण भागातही ही सेवा देण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.