Sobat Sakhichi : सोबत सखीची – स्त्रियांच्या व्याधी !

Diseases in women नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची 'सोबत सखीची' ही लेख व व्हिडिओ मालिका

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. स्त्रियांच्या व्याधी, या विषयावरील या मालिकेतील हा दुसरा भाग…


सोबत सखीची – भाग 2

स्त्रियांच्या व्याधी !

मागच्या लेखात आपण स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे कोणते हे आपण पाहिलं.

मासिक पाळीची सुरुवात, लग्न, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, मुलांचं संगोपन आणि मासिक पाळी बंद होण्याचा काळ हे 13 ते पन्नास या वयोगटातल्या स्त्रियांसाठी फार महत्वाचे टप्पे आहेत. या वयालाच reproductive age group असे म्हणतात. या सगळ्या अवस्था अजिबात उसंत न घेता एकापाठोपाठ एका क्रमाने येतच असतात.

या काळात स्त्रियांना होणारे आजारांचं दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं. Gynecological disorders आणि Obstetrical disorders.
पहिला आहे Gynecological disorders. यामध्ये स्त्रियांची प्रजनन संस्था, त्यांच्या शरीरातले हार्मोन्स आणि मासिक पाळीशी निगडीत आजारांचा समावेश होतो. आणि दूसरा प्रकार Obstetrical disorders. म्हणजे प्रसूतीशी निगडीत व्याधी. यामध्ये प्रसूतिपूर्व अवस्था, गरोदर अवस्था, डिलिव्हरी आणि सूतिका म्हणजे बाळंतींणीचे व्याधी या सर्वांचा समावेश होतो.

आपल्याला स्त्रियांच्या बाबतीतल्या हेल्थ issues ची माहिती करून घ्यायची असेल तर गर्भाशय आणि एकूणच प्रजनन संस्थेची थोडक्यात का होईना रचना जाणून घ्यायला हवी.

स्त्रियांच्या शरीरात स्त्री बीज ज्यामध्ये तयार होतात अशा दोन ओव्हरी, स्त्रीबीज वाहून नेणाऱ्या दोन नलिका, एक गर्भाशय आणि एक योनीमार्ग असे भाग शरीराच्या आतमध्ये ओटीपोटात असतात. आपल्याला बाहेरून फक्त त्याचं ओपनिंग म्हणजे एक छोटीशी जागा दिसते ज्याच्यातून मासिक पाळीचा स्त्राव बाहेर येतो. डिलिव्हरीच्या वेळी गर्भशयातील गर्भ बाहेर येण्याचीही तीच जागा असते.

स्त्रियांच्या शरीराची रचना एका बाजूने बघितली तर लक्षात येईल की गर्भाशय, गर्भाशयाच्या पुढे युरीन साठून रहाते ते ब्लॅडर, आणि गर्भाशयाच्या पाठीमागे अन्नमार्गाचा शेवटचा भाग “कोलोन” ज्यामध्ये मलभाग साठून रहातो तो हे सर्व अवयव ओटीपोटातल्या पोकळीत एका रेषेत असतात.
आणि त्या सर्वांची ओपनिंग्स म्हणजे शरीराच्या बाहेर पडण्याच्या जागा त्वचेवर सुद्धा एकाच रेषेत असतात. या जागा इतक्या जवळ जवळ असतात की एका जागेचं इन्फेक्शन दुसऱ्या जागेपर्यंत आतल्या आतून सुद्धा आणि त्वचेच्या माध्यमातून दुसऱ्या ओपनिंग पर्यन्त आणि तिथून वरती ओटीपोटातल्या अवयवांपर्यंत सहजासहजी पोचू शकतं.

ही ओपनिंग्स आणि त्याच्या आजूबाजूची जागा याला पेरीनियम असे म्हणतात. स्त्रियांच्या बाबतीत युरीन पास करणे आणि मलत्याग करणे या दोन्ही क्रियांसाठी बसण्याच्या पोजिशन मध्ये तिन्ही ओपनिंग्स जमिनीपासून खूप जवळ असतात आणि त्या पृष्ठभागावरील जंतु या मार्गांमध्ये फार लवकर शिरकाव करतात.

अर्थात याची इतर ही काही कारण आहेत, जी आपण नंतर कधी तरी दुसऱ्या व्हिडियोमध्ये / लेखामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत,  पण या आणि अशा कारणांमुळेच स्त्रियांमध्ये युरीन इन्फेक्शन आणि योनि मार्गाचा संसर्ग वरचेवर बघायला मिळतो.  या करणासाठीच शक्यतो उघड्यावर किंवा सार्वजनिक टॉयलेटचा वापर शक्य तिथे टाळावा.  याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा वापर करूच नये, चाळीमध्ये जिथे कॉमन टॉयलेट आहेत तिथे रहाणाऱ्या, कामासाठी घराच्या बाहेर बराच वेळ घालवणाऱ्या , शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलींना यांचा वापर करावाच लागतो. ते पूर्णत: टाळणं आपल्या हातात नाही आणि निव्वळ त्या कारणासाठी मल मुत्रत्यागाच्या संवेदना अडवून ठेवणे हे ही तितकंच चुकीचं आहे.

निसर्गाने शरीराची रचना करतानाच स्त्रियांचा योनिमार्ग नैसर्गिकरित्या कसा सुरक्षित राहील याची सुद्धा तरतूद केलेली आहे. त्यानुसार योनिमार्गात डोडर्लीन्स बॅसिलाय नावाच्या विशिष्ट जंतूंची नेहमी पैदास होत असते. त्यामुळे योनिमार्गाचा पीएच आणि पर्यायाने प्रतिकारशक्ति टिकून राहते. योनिमार्गाच्या प्रतिकार शक्तिची सोय निसर्गाने केली आहे, पण त्यासाठी लागणारी स्वछता ठेवणं आपल्या हातात आहे.

यासाठी खूप काही वेगळ करायला नको. नुसतं washroom ला गेलं की योनिमार्गाच्या आसपासची जागा पाण्याने स्वच्छ धुणे, आधी योनिमार्गा जवळची जागा आणि मग गुद द्वाराजवळची अशी पुढून मागच्या दिशेला जागा धुणे ( कारण उलट्या म्हणजे खालून वरच्या दिशेने जागा धुतल्यास मलावाटे जे असंख्य अपायकरक जंतु शरीराच्या बाहेर पडतात ते योनिमार्गातून आणि मूत्रमार्गाच्या ओपनिंगमधून पुन्हा शरीरात जाऊ शकतात.) त्यामुळे वरुन खालच्या दिशेने जागा धुणे, जागा स्वच्छ कोरडी ठेवणे या साध्या साध्या उपायांनी देखील आपण infection होण्याचे प्रमाण कमी करू शकतो.

आजच्या लेखासंदर्भात / व्हिडियो संदर्भात आणि माहितीच्या संदर्भात आपल्याला काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या मेल आय डी वर मेल करा.

आपल्याकडुन वेगवेगळ्या विषयावर व्हिडियो करण्यासाठी सजेशन्स येत आहेत, मी नक्की त्यावर विडियो बनवेन.  आपल्याला आजचा लेख आवडला तर शेअर करा.

पुढच्या आठवड्यात मासिक पाळीविषयी माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.