Chinchwad : चिंचवडला पौर्णिमा संगीत सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे नादब्रह्म परिवार, अनाहत संगीत अकादमी व श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने पौर्णिमा संगीत सभा आयोजित केली होती. या संगीत सबेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मैफलीचा  प्रारंभ राग जोगमधील “पिहरवा को बिरमाये” या विलंबित एक तालातील ख्यालाने झाला. जोड बंदीश “साजन मोरे घर आयो.”(त्रिताल) ही होती. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे प्रसिद्ध भजन “विष्णुमय जय वैष्णवाचा धर्म” सादर केली. पागेपाट तारील हा “तुज गिरीजा शंकर” हे नाट्यपद सादर करुन रसिकांची दाद मिळविली. या मैफलीस डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे उत्तरार्धात पंढरीचा वास चंद्रभागेस्नान हा अभंग गायला.

संत भारपंढरीत अभंग सादर केल्यानंतर इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले. या भैरवीने गान समाप्ती केली. साथ संगत – वृषाली भणगे (तबला), शशिकांत अरक (संवादिनी), टाळ साथ (जयेश शेळुडकर) यांनी केली. मैफलीचे सूत्रसंचालन अरुण चितळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.