Kudalwadi : प्राथमिक आरोग्य केंद्र कुदळवाडीत लवकरच सुरु होणार; दिनेश यादव यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – कुदळवाडीत लहान मुले, महिला यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यासाठी स्विकृत सदस्य नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे कुदळवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणी आणि पाहणी करण्यासाठी वैद्यकीय विभागाचे एक पथक पाठविले होते.

या पथकाने आरोग्य केंद्र उभारणीबाबत सकरात्मक अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय संचालक तथा अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना पाठविला असून, त्याची एक प्रत स्विकृत सदस्य यादव यांना पाठविली आहे.

  • यात त्यांनी म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये कुदळवाडी चिखली येथे वैदयकिय अधिकारी डॉ. सुनिता साळवे यांनी स्वत: सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता या भागात साधारण १६ ते २० हजार लोकसंख्या असल्याचे दिसून आले. या ठिकाणी दाट लोकसंख्या असल्याने व आर्थिक दुर्बल लोक असल्याचे आढळून आले. त्यांना कुठल्याही प्रकारची वैदयकिय सेवा सुविधा घेण्यास आकुर्डी रुग्णालय येथे येण्यास आंतर जास्त असल्याने तेथील नागरिकांना अडचण निर्माण होते.

स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या विनंतीनुसार आकुर्डी रूग्णालयामार्फत कुदळवाडी येथे दर शुक्रवारी फिरते लसीकरण सत्र घेऊन समुपदेशन व वैदयकिय उपचार दिले. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरी, वर नमूद केलेल्या सर्व बाबी लक्षात घेता आणि स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या मागणीनुसार कुदळवाडी,चिखली येथे योग्य जागा मिळाल्यास एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यास हरकत नाही, असे या निवेदनांत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.