Pune – माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारपासून पुण्यात

एमपीसी न्यूज – शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन वर्ष २०२३ दि. २७ व २८.०५.२०२३ रोजी सैनिक लॉन्स, पुणे (Pune) येथे नियोजन करण्यात आलेले आहे.
PCMC : नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा डाव
यामध्ये राज्यभरातून संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच सैनिक कल्याण विभागाचे संचालक माननीय ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड आणि उपसंचालक कर्नल (निवृत्त) जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि सदर अधिवेशनास मार्गदर्शन करणार आहेत.
संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख व राज्य पदाधिकारी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतील. या अधिवेशनात संघटनेचा वार्षिक अंक कर्मयोध्येचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच संघटनेच्या पुढील वाटचाली बाबत दिशा ठरवली जाणार आहे आणि विशेष कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेच्या पुणे (Pune) जिल्ह्याने केले आहे.
Pune : हवामान खात्याचा सुधारीत अंदाज जाहीर, यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस