Pune News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हल उद्यापासून पुण्यात

एमपीसी न्यूज : माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हल उद्यापासून (सोमवार, दि.11)  पुण्यात सुरु होत आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश आहे.

पुण्यातील म्हात्रे पुलानजिक असलेल्या तेंडुलकर उद्यानाशेजारील इंद्रधनु हॉल येथे सकाळी 11.30 ते 4.00 यावेळेत लघुचित्रपट पहायला मिळतील. यातील निवडक 20 लघुपटाचे प्रक्षेपण व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि.12) सायंकाळी चार वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे होणार आहे.

पारितोषिक वितरण समारंभाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, इन्व्हारमेंट क्लब ऑफ इंडियाचे निलेश इनामदार, लेखक व दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.

पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिवल पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने, माय अर्थ फौंडेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी  संकटे निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.