Chinchwad News : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (रविवारी, दि. 10) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सकाळपासून चिंचवड गावात असलेल्या उड्डाणपुलाच्या परिसरात फिरत होता. त्याने सकाळी दोन पीएमपीएमएल बसच्या खाली जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने अकरा वाजताच्या सुमारास चाफेकर चौकातून जुना जकात नाक्याकडे जाणा-या उड्डाणपुलावर जाऊन खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तो उड्डाणपुलावरून उडी मारत असताना नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने तात्काळ रिक्षातून उड्डाणपुलावर जाऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला उड्डाणपुलावर पोहोचण्यापूर्वीच त्याने खाली उडी मारली. त्या तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. उडी मारणारा व्यक्ती जळगावचा असून तो रावेत पुनावळे येथे राहत असल्याची माहिती त्याने सांगितली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. तसेच तो मनोरुग्ण असल्याचेही म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.