Khadaki : पुण्यात रंगणार राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

एमपीसी न्यूज – कै. तुकाराम भापकर प्रतिष्ठानतर्फे ७ ते ९ सप्टेंबर २०१९ दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खडकी बाजार येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची व आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने, ही स्पर्धा आयोजित  करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांना ८० हजार रुपयांची पारितोषिके तसेच चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.mharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. खेळाडूंनी आपली नावे ३० ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे द्यावीत. तसेच स्पर्धकांनी आपले नावे [email protected] मेल आय डी वर पाठवावीत, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.