Wakad : महिलांवरील अन्याय थांबवावे – अनवाधिकार संघटनेची पोलिसांकडे मागणी 

एमपीसी न्यूज –   येथील वाकड पोलीस ठाण्यात पुणे जिल्हा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या रक्षाबंधन साजरा करण्यात आला. संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी राख्या बांधून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून महिलांचे संरक्षण करावे अशी मागणी वर्दीतील आपल्या भाऊरायाकडे केली.

यावेळी सहायक निरीक्षक तानाजी भोगम, उपनिरीक्षक बाबर, कर्मचारी सुदर्शन कापरे, बाळासाहेब पन्हाळे, तुषार साळुंके, राजाराम शेळके, श्यामवीर गायकवाड, अभिमन्यू बनसोडे, हेमंत हांगे या सर्वाना मानवाधिकार संघटनेच्या पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा नूरजहाँ शेख, प्रिया टिंगरे, निकिता नवघन, राणी सोनावणे, दिव्या टिळक, गौरी शेठ, पूनम कांबळे या सदस्यांनी राखी बांधून पोलीस बांधवांचे औक्षण केले.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सुभाष कोठारी, निरीक्षक दिलीप टेकाळे, संघटक मुनीवर शेख,  विकास कांबळे, अविनाश रानवडे, ओंकार शेरे, लक्ष्मण देवने, ऍड. विजय मैड, डॉ. सतीश नगरकर या पदाधिकाऱ्यांना देखील महिलांनी राख्या बांधून भाऊ बहणीचे नाते दृढ केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.