Pune : साखर कारखानदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे द्यावेत

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यातील विविध घटकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत केली जाते. मात्र, मागील दोन वर्षाच्या काळात अनेक कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला नाही, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे सर्वानी लवकरात लवकर निधी द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तर या त्यांच्या विधानानंतर बँकांकडून 5 कोटीचा निधी मुख्यमंत्र्याकडे देण्यात आला. 

पुण्यात दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वतीने साखर परिषद 20-20 चे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाच्या समारोपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, विद्याधर अनासकर तसेच साखर कारखानदार देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, सरकारला पाहिजे तशी मदत काखान्यांनी केली नाही. तरी आपण भरपूर पाणी वापरत आहात. दुष्काळी स्थिती निर्माण होत असताना ठिबकला कारखान्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्र जल प्राधिकरणाने दिलेले तीन वर्षे संपणार आहे. मग शासनाला कडक कारवाई करावी लागेल, अशा शब्दात कारखानदारांचे कान मुख्यमंत्री टोचले.

तर ते पुढे म्हणाले की, साखर उद्योग हा महाराष्ट्रच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा घटक आहे. या उद्योगाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम राज्य सहकारी बँकांनी केले आहे. मात्र, आजवर साखर कारखानदार अडचणीत आले की बँक अडचणीत आल्या आहेत.  याचा परिणाम सर्व घटकांवर पडला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील अर्थकारणामधील सारख उत्पादक हा घटक महत्वाचा ठरला आहे. साखर कारखाने अडचणीमध्ये आले की, बँक देखील अडचणीत येत असते. त्यामुळे कारखानदारांनी खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.