Pune News : कंपनीत कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पिंपरी खुर्द रेल्वे क्रॉसिंग जवळ एका चाळीस वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय 40) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हंबीरराव जगताप हे बारामती जवळच्या मळशी येथील रहिवासी आहेत. सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास कंपनीत कामाला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर पुणे-कोल्हापूर रेल्वे लाईन वर धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नीरा पोलीस चौकीत मयताचे भाऊ लक्ष्मण जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान हंबीरराव जगताप यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले पोलीस आणि पोलीस मित्रांनी याची माहिती जगताप यांच्या कुटुंबीयांना दिली. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.