Chikhali : आजारपणाला कंटाळून पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आजाराला कंटाळून चिखली पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास कावेरी नगर, वाकड येथे उघडकीस आली.

चंद्रकांत टिळेकर (वय 45, रा. कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिळेकर निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवार (दि. 6) रोजी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अंतर्गत बदल्यांच्या आदेशानुसार त्यांची चिखली पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मागील तीन महिन्यांपासून टिळेकर रजेवर होते. त्यामुळे ते चिखली पोलीस ठाण्यात अजून हजर देखील झाले नव्हते. दरम्यान त्यांनी आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टिळेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.