Crime News : लग्नानंतर सहा महिन्यातच तरुणीची आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाला सहा महिने झाल्यानंतर सासरच्या लोकांकडून घरातील कामावरून छळ सुरू असल्याने 24 वर्षीय नवविवाहित तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.सुधाराणी संदिप वाघे (वय 24, रा. कोंढवा-बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पती संदीप नामदेव वाघे तसेच सासू व इतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सुधाराणी यांचा भाऊ सिद्धलिंग कुसनेरे (वय19) यांनी तक्रार दिली आहे.सुधाराणी व संदिप यांचा मार्च 2022 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर मात्र पती व सासू हे त्यांना घरातील काम जमत नाही, तुला स्वयंपाक येत नाही, यावरून टोमणे मारून बोलत होते. तर, त्यांचा माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारिरीक छळ केला जात होता.त्यांना मारहाण देखील केली जात होती.या त्रासाला कंटाळून सुधाराणी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.