Sushant Singh Rajput Last Post: आईला साद घालणारा सुशांत अखेरीस गेला आईच्याच भेटीला…

Sushant Singh Rajput commit suicide: suhant singh rajuput remembers his mother in last insta post अत्यंत संवेदनशील असलेल्या सुशांतच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. सुशांतच्या आईचे 2002 मध्येच निधन झाले होते.

एमपीसी न्यूज- महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केल्याने फेमस झालेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याची ‘मॉ’ ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अत्यंत संवेदनशील असलेल्या सुशांतच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. सुशांतच्या आईचे 2002 मध्येच निधन झाले होते. तो आपल्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण असल्याचे सुशांतने एका मुलाखतीत म्हटले होते.


काही दिवसांपूर्वी सुशांतने त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं.

त्यासोबत लिहिले होते, “अश्रूंच्या थेंबांतून अंधुक होत जाणारा भूतकाळ. एकीकडं, कधीच अंत नसलेली स्वप्नं हास्याचं इंद्रधनु फुलवताहेत आणि त्याचवेळी समोर हे क्षणभंगुर जगणं. या दोन्हींमधून मी काय निवडायचं, आई?”

सुशांत मागील सहा महिन्यांपासून नैराश्यावर औषधोपचार घेत होता, असे यावेळी उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याने नैराश्यात आत्महत्या केली असं म्हटलं जात असून त्याचे खरे कारण अद्याप कळलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.