_MPC_DIR_MPU_III

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहर आणि संजय लीला भन्साळीसह 8 जणांविरोधात गुन्हा

Sushant Singh Rajput suicide case: Crime against 8 persons including Salman Khan, Karan Johar and Sanjay Leela Bhansali

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान, कारण जोहर, एकता कपूर आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह आठ जणांविरोधात बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

सुधीर कुमार ओझा या वकिलाने या कलाकारांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,109,504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सिंह राजपूत याला सात वेगवेगळ्या सिनेमातून वगळण्यात आले.

तसेच त्याचे काही सिनेमे प्रदर्शित सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे सुशांतने असे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कंगना रानौत या अभिनेत्रीने सुद्धा बॉलीवूडवर आरोप करत सुशांत हा बॉलीवूडच्या घाणेरड्या राजकारणाचा बळी असून ही आत्महत्या नाही तर खून असल्याचे ती म्हणाली होती.

दबंग सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने सुद्धा सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर आरोप करत खान कुटुंबीय नेहमीच माझे सिनेमे अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करायचे, असा आरोप केला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.