Dehuroad: अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई करा; सामाजिक कार्यकर्ते अशरफ आत्तार यांची मागणी 

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग आहेत. अतिशय धोकादायक हे होर्डिंग आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशरफ आत्तार यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे केली आहे. 

याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये अशरफ आत्तार यांनी म्हटले आहे की, पुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडल्याने शुक्रवारी (दि.5)चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. देहूरोड परिसरात देखील अनधिकृत होर्डिंग आहेत. होर्डिंग अतिशय धोकादायक आहेत. दोन होर्डिंग गंजले आहे. ते कदीही पडू शकतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यासाठी तातडीने देहूरोड परिसरातील होर्डिंग काढण्यात यावेत. तसेच अनधिकृत होर्डिंग लावण्यात येऊ नयेत. त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आत्तार यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.